
पक्षाबाहेर गेलेल्यांचे दु:ख नाही
पुणे, ता. २६ : ‘‘शिवसेना पक्ष शिवसैनिकांच्या भावना आणि विचारांवर चालत आहे. अनेकदा लोकांनी पक्षातून बाहेर जाण्याचा प्रसंग येऊन गेला. मात्र, भगवद्गीतेत सांगितल्यानुसार जे गेले त्यांच्याबाबत दु:ख व्यक्त न करता आपले काम सातत्याने पुढे चालू ठेवायचे. या तत्त्वानुसार शिवसेनेचे कार्य सुरूच राहील,’’ असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली. तसेच, श्री गणेशांना ६२ किलोंचा मोदक अर्पण करण्यात आला.
‘‘उद्धव ठाकरे यांचे सर्व संकल्प पूर्ण होवोत. शिवसेनेचा वटवृक्ष विशाल महावृक्षात रूपांतरित होवो,’’ अशी प्रार्थना केल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
शिवसहकार सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब भांडे, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे यांनी ‘श्रीं’ना अभिषेक केला. पुणे जिल्हा संघटक राम गायकवाड, नितीन चांदेरे, उप शहर प्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, संतोष गोपाळ, म्हाळुंगेचे सरपंच मयूर भांडे, संजय गवळी, अविनाश मरळ, शादाब मुलाणी, स्वप्नील कुंजीर, धनंजय चौधरी, युवराज शिंगाडे, राजू विटकर, महिला आघाडीच्या संगीता ठोसर, पल्लवी जावळे, कल्पना थोरवे, श्रुती नाझीरकर, स्वाती कथलकर, कविता आंब्रे, ज्योती चांदेरे, विद्या होडे, शर्मिला येवले, अनिता परदेशी, निकीता मारटकर, गायत्री गरुड आदी या वेळी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83611 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..