मंडई परिसरातील वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडई परिसरातील वाहतुकीत बदल
मंडई परिसरातील वाहतुकीत बदल

मंडई परिसरातील वाहतुकीत बदल

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : महात्मा फुले मंडई परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कामामुळे गुरुवारी (ता. २८) व शुक्रवारी (ता. २९) मध्यरात्री एक ते पहाटे पाच वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील समाधान चौकापासून ते स्वारगेटपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन विश्रामबाग वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडई येथे अमराळे रस्ता, गोटीराम भैय्या चौक, झुणका भाकर केंद्र व त्यालगतच्या भागामध्ये मंडई मेट्रो स्टेशनचे काम करण्यात येत आहे. शुक्रवारी व शनिवारी रात्री या परिसरात महत्त्वाचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित वाहने रामेश्‍वर चौकाकडून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जातील. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83627 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top