पुण्यात १.३१ कोटीचे अमली पदार्थ जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात १.३१ कोटीचे अमली पदार्थ जप्त
पुण्यात १.३१ कोटीचे अमली पदार्थ जप्त

पुण्यात १.३१ कोटीचे अमली पदार्थ जप्त

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन दांपत्यास अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून एक कोटी रुपये किमतीचे कोकेन, एमडी असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

उगचुक ईम्यानुअल (वय ४३, रा. नालंदा रेसिडेन्सी, बाणेर), एनिबेली ओमामा व्हिवान (वय ३०, रा. नालंदा रेसिडेन्सी, बाणेर, दोघेही मूळ रा. नायजेरिया) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील नालंदा रेसिडेन्सी येथे दोन व्यक्तीकडे अमली पदार्थ असून त्यांच्याकडून अमली पदार्थ विक्री केली जात असल्याची खबर अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (क्रमांक एक) पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण डेंगळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने बाणेर येथे छापा घातला. त्यावेळी ईम्यानुअल व व्हिवान तेथे आढळले. त्यांनी बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी ९६ लाख ६० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (एम), ३० लाख हजार रुपयांचे २०१ ग्रॅम वजनाचे कोकेन, २ लाख १६ हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण एक कोटी ३१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण डेंगळे, पोलिस कर्मचारी मारुती पारधी, मनोज साळुंखे, राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी आदीच्या पथकाने केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83636 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top