चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

येत्या आठवड्यात पुणेकरांनी चुकवू नयेत, असे काही सांस्कृतिक कार्यक्रम

१) संगीत संवाद ः
पं. कमलाकर जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिष्यवर्गातर्फे ‘गुण घेईन आवडी-संवाद गानगुरुंशी’ या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ‘सौंदर्यपूर्ण बंदिशी’ या विषयावरील संगीत संवादाचे आयोजन केले आहे. यात पं. सत्यशील देशपांडे, डॉ. अलका देव-मारुलकर आणि पं. सुरेश तळवलकर सहभागी होणार आहेत.
कधी ः गुरुवार (ता. २८)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः बालशिक्षण सभागृह, मयूर कॉलनी

२) भरतनाट्यम कार्यक्रम ः
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालय आणि भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ यांच्यातर्फे बंगळुरू येथील नृत्य कलावंत डॉ. शेषाद्री अय्यंगार यांच्या भरतनाट्यम्‌‍ नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाची सुरुवात गुरू शमा भाटे यांची शिष्या ईशा नानल हिच्या कथक नृत्याने होणार असून आयसीसीआरमधील विद्यार्थ्यांचीही नृत्यप्रस्तुती होणार आहे.
कधी ः शुक्रवार (ता. २९)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, पौड रस्ता

३) ‘सिद्धनाद’ ः
‘सिद्धी म्युझिकल्स, पुणे’च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त सिद्धनाद या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मैफिलीत तबलावादक सिद्धिविनायक पैठणकर आणि युवा गायिका अंजली व नंदिनी गायकवाड या सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रसिद्ध तबलावादक पं. अनिंदो चॅटर्जी उपस्थित राहणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. ३०)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः विष्णू विनायक स्वरमंदिर, गांधर्व महाविद्यालय

४) गायन-वादन मैफल ः
प्रेरणा संगीत संस्था आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रेरणा संगीत संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त गायन-वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन आणि ज्येष्ठ बासरीवादक अमर ओक यांच्या बासरीवादनाची जुगलबंदी होईल. त्यानंतर ज्येष्ठ संतूरवादक पं. सतीश व्यास यांचे संतूरवादन सादर होणार आहे.
कधी ः शनिवार (ता. ३०)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

५) ‘स्वरउन्मेष’ ः
वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे ‘स्वरउन्मेष’ या दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात ईश्वर घोरपडे, रुजुता लाड, आदित्य मोडक, श्रुती विश्वकर्मा आणि रमाकांत गायकवाड यांचे गायन तसेच मानस कुमार यांचे व्हायोलिन वादन होणार आहे.
कधी ः शनिवार (ता. ३०) व रविवार (ता. ३१)
केव्हा ः रात्री ९ वाजता
कुठे ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

६) ‘डान्स फेस्टिव्हल’ ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘लाऊड अॅप्लॉज डान्स फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. यामध्ये कथक आणि भरतनाट्यमचे सादरीकरण होणार आहे. ‘लाऊड अॅप्लॉज’ या डान्स मॅगझीनच्या संपादक आणि ‘कथक पाठशाला’च्या संस्थापक नेहा मुथियान यांच्या संयोजनाखाली अभिषेक धावडे, कीर्ती कुरांडे, ईशा नानल, पूजा भट्टड, अनंगा मंजिरी, रिद्धी पोतदार, अथर्व चौधरी, वैष्णवी पुणतांबेकर यात सहभागी होणार आहेत.
कधी ः रविवार (ता. ३१)
केव्हा ः सायंकाळी ५ वाजता
कुठे ः भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,
सेनापती बापट रस्ता

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83751 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..