‘राजमुद्रा ढोल ताशा’तर्फे मानव्य संस्थेला मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘राजमुद्रा ढोल ताशा’तर्फे 
मानव्य संस्थेला मदत
‘राजमुद्रा ढोल ताशा’तर्फे मानव्य संस्थेला मदत

‘राजमुद्रा ढोल ताशा’तर्फे मानव्य संस्थेला मदत

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : राजमुद्रा ढोल ताशा पथकाने वाद्यपूजन समारंभ अनोख्या पद्धतीने केला असून, वाद्यपूजन आणि सराव प्रारंभासाठी येणाऱ्या उत्पन्नातून मानव्य या एड्सबाधित अनाथ रुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थेला आर्थिक मदत केली.

राजमुद्रा ढोल ताशा पथक गेल्या १७ वर्षांपासून पुण्याबरोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने कला सादर करीत आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील खर्च वजा केल्यावर उरलेल्या रकमेतील काही वाटा समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी दरवर्षी उपयोगात आणला जातो. या प्रसंगी अभिनेता आरोह वेलणकर, सूरज थोरात, संकेत मते आदी उपस्थित होते. ‘‘राजमुद्रा ढोल पथकाच्या माध्यमातून समाजात विधायक कार्य घडत आहे. अशा कार्यात मला सहभागी होता आले याचा विशेष आनंद असल्याचे अभिनेता आरोह वेलणकर या प्रसंगी म्हणाला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83782 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..