मूर्ती स्थापनेपूर्वी परवाना बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूर्ती स्थापनेपूर्वी परवाना बंधनकारक
मूर्ती स्थापनेपूर्वी परवाना बंधनकारक

मूर्ती स्थापनेपूर्वी परवाना बंधनकारक

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः श्री मूर्ती स्थापना व आराससंदर्भात गणेश मंडळाने धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करून घ्यावी. गणपती स्थापनेपूर्वीच सर्व मंडळांनी पोलिस परवाना घेणे बंधनकारक आहे. एक खिडकी योजनेनुसार परवान्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. वर्गणी सक्तीने किंवा वाहने अडवून जमा करू नये, अशा प्रकारची आचारसंहिता पोलिसांनी गणपती मंडळांसाठी जाहीर केली आहे.

गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी पोलिस आयुक्तालयात आयोजित केली होती. त्यावेळी गणपती मंडळांसाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. यावेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अप्पर पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, जालिंदर कामठे, नामदेव चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, प्रसाद कुलकर्णी, प्रवीण परदेशी, विकास पवार, नितीन पंडित, पुनीत बालन, धीरज घाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी गणपती मंडळांनीदेखील विविध मागण्या केल्या. उत्सवाचा पाचवा दिवस (गौरीपूजन), सातवा दिवस, नववा दिवस आणि अनंत चतुर्दशी या निश्चित केलेल्या दिवशी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक सकाळी सहा वाजता ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.

...अशी असेल आचारसंहिता
- गणपती मंडप सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्त्याचा १/३ भाग उपयोगात आणून बांधावा.
- गणेश मूर्तीची उंची मर्यादित असावी, मूर्ती पारंपरिक असल्यास देखाव्यांच्या उंचीची मर्यादा मर्यादित असावी.
- रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय, दवाखाने यांच्या कमीत कमी १०० मीटरच्या परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करू नये.
- प्रेक्षक अथवा सुरक्षारक्षकांच्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी.
- उत्सवामध्ये व मिरवणुकीमध्ये करण्यात येणाऱ्या देखाव्याची माहिती अगोदर पोलिस ठाण्यात कळविणे आवश्यक.
- वादग्रस्त ठरतील अशा विषयावर कार्यक्रम, देखावे किंवा सजावटी सादर करू नयेत.
- उत्सवात मंडळाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांची यादी व रूपरेषा पोलिसांना आगाऊ कळवावी.
- महत्त्वाच्या व गर्दी खेचणाऱ्या गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व त्यांचे रेकॉर्डिंग करावे.
- प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त दोन बॉक्स कमानी उभारता येतील, ती २० फुटांपेक्षा जास्त नसावी.

गणपती मंडळांच्या मागण्या...
- २०१९ च्या मंडप परवानगीनुसार मंडपात काही बदल नसल्यास मंडप परवानगी पाच वर्षे मुदतीसाठी द्यावी.
- पादचारी मार्गाचे नियोजन करून पुण्याच्या पूर्व भागात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा.
- गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या परवानगीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी.
- जाहिरात कमानींबाबत लवचिक धोरण ठेवावे.
- शक्य असेल त्या रस्त्यावर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83853 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..