काँगेसच्या कार्यकर्त्याचा रेल रोको खडकी स्थानक; पुणे-लोणावळा लोकल चार मिनिटे रोखून ठेवली, आरपीएफ गुन्हा दाखल करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँगेसच्या कार्यकर्त्याचा रेल रोको 

खडकी स्थानक; पुणे-लोणावळा लोकल चार मिनिटे रोखून ठेवली, आरपीएफ गुन्हा दाखल करणार
काँगेसच्या कार्यकर्त्याचा रेल रोको खडकी स्थानक; पुणे-लोणावळा लोकल चार मिनिटे रोखून ठेवली, आरपीएफ गुन्हा दाखल करणार

काँगेसच्या कार्यकर्त्याचा रेल रोको खडकी स्थानक; पुणे-लोणावळा लोकल चार मिनिटे रोखून ठेवली, आरपीएफ गुन्हा दाखल करणार

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईंडी चौकशीचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँगेसच्या काही कार्यकर्त्यांनी खडकी स्थानकांवर बुधवारी रेल रोको केला. पुण्याहून सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी लोणावळ्यासाठी निघालेल्या लोकलला खडकी स्थानकांवर थांबवली. लोकलवर चढून कार्यकर्त्यानी निषेधाच्या घोषणा दिल्या. चार ते पाच मिनिटे लोकल थांबवून ठेवली. विशेष म्हणजे याची कल्पना आरपीएफ व रेल्वे प्रशासनाला नसल्याने कार्यकर्त्यांना कोणताही अटकाव झाला नाही. या प्रकरणी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे आरपीएफने सांगितले.

खडकी स्थानकांवर साडेपाचच्या सुमारास लोकल दाखल होताच. उपस्थित कार्यकर्त्यांनी लोकलच्या बफरवर चढून आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी इडीच्या निषेधाच्या घोषणा देत, काँगेस जिदाबादचा नारा दिला. चार ते पाच मिनिटे लोकल रोखून ठेवली. यानंतर काही आरपीएफ आल्यानंतर त्यांना हुसकाविण्यात आले. मात्र, आरपीएफच्या गुप्तचर यंत्रणेला याचा ठावठिकाणा देखील नव्हता. खडकी स्थानकांवर आरपीएफचे ठाणे असताना, पुरेसे मनुष्यबळ असताना देखील कार्यकर्त्यांना अटकाव का झाला नाही हा? प्रश्न निर्माण झाला.

‘आरपीएफ’चे अपयश :
आरपीएफच्या अंतर्गत असणाऱ्या ‘एसआयबी’ ही शाखा रेल्वेच्या संदर्भात असलेली गुप्त माहिती काढणे, हालचालीवर बारीक नजर ठेवणे, आदी कामे करीत असते. मात्र, बुधवारी झालेल्या रेल रोकोची एसआयबीला माहिती नव्हती. त्यामुळे रेल रोको नंतर रेल्वे प्रशासन एकच खळबळ उडाली. यामुळे आरपीएफचे हे अपयश असल्याचे सिद्ध झाले.

स्थानक व्यवस्थापकांची मध्यस्थी
कार्यकर्ते लोकलवर चढल्यावर त्यांना उतरविण्यासाठी खडकीचे स्थानक व्यवस्थापक विश्वजित कीर्तिकर यांनी पॉइंट्सपण राहुल तिवारी यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर ते कार्यकर्ते खाली उतरले. त्यानंतर लोकल मार्गस्थ झाली.

रेल रोको करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. रेल्वे स्थानक परिसरात अवैध पणे प्रवेश करणे, रेल्वे परिचलनात बाधा निर्माण करणे आदी प्रकारचे गुन्हे दाखल केले जातील.
- उदयसिंह पवार, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83926 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..