देशाच्या प्रगतीला विजेमुळे वेग : आयुष प्रसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशाच्या प्रगतीला विजेमुळे वेग : आयुष प्रसाद
देशाच्या प्रगतीला विजेमुळे वेग : आयुष प्रसाद

देशाच्या प्रगतीला विजेमुळे वेग : आयुष प्रसाद

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : ‘‘गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर राबविलेल्या विविध योजनांमुळे देशातील प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे. सर्व वीजग्राहकांसाठी आज मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध आहे. देशाच्या प्रगतीची चाके देखील विजेमुळेच वेगाने फिरत आहे. त्यामुळे ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त आयोजित ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य’ हा ऊर्जा क्षेत्रातील महाक्रांतीचा महोत्सव आहे, ’’असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.
केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय तसेच ऊर्जा खातेअंतर्गत महावितरण, महानिर्मिती व महापारेषण यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित ‘आजादी का अमृत महोत्सवा’निमित्त ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य, पॉवर@४७’ या ऊर्जा महोत्सवाचे प्रसाद यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार अशोक पवार, प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार व राजेंद्र गायकवाड, पॉवर ग्रीडचे महाव्यवस्थापक एच. लल्लीयनसियामा, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, सीओईपीचे उपसंचालक मनोज राठोड उपस्थित होते.
या वेळी पुणे जिल्ह्यातील विविध विद्युत योजनांचे लाभार्थीनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता पवार यांनी केले. ऊर्जा खात्यांच्या विविध योजना व उपलब्धीबाबत लघुचित्रफित दाखविण्यात आल्या तर पथनाट्याद्वारे विविध योजनांचा जागर करण्यात आला.

ग्रामीण भागातही वीज पोहोचवण्यात यश
आठ वर्षांमध्ये भारतातील वीजनिर्मितीची क्षमता ४ लाख मेगावॅटवर गेली असून शेजारच्या देशांमध्ये विजेची निर्यात करण्यात येत आहे. १ लाख ६३ हजार सर्किट किलोमीटर लांबीची एकच ग्रीड एकाच फ्रिक्वेन्सीवर सुरु असून त्याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात १ लाख १२ हजार मेगावॅट विजेचे वहन करण्यात येत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचविण्यासाठी २ लाख १ हजार ७२२ कोटी रुपये खर्चाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. त्याद्वारे ३९२६ नवीन उपकेंद्र, ८ लाख ७३ हजार ३०३ सर्किट किलोमीटरची उच्च व लघुदाब वाहिन्या व १ लाख २२ हजार १२३ कृषी वीजवाहिन्यांचे विलगीकरण व उभारणी केल्याची माहिती महावितरणने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83933 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top