पुण्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू
पुण्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू

पुण्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : ससून रुग्णालयात स्वाइन फ्लूमुळे ६० वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. हा पुण्यातील गेल्या सात वर्षांमधील स्वाइन फ्लूचा पाचवा मृत्यू असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. राज्यभरात सद्यःस्थितीत २९३ स्वाइन फ्लूचे रुग्ण असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले.
पुण्यातील साठ वर्षांच्या महिलेला कोरोना झाल्याने एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. तेथे पंधरा दिवस कोरोनावर उपचार करण्यात आले. त्यानंतर खासगी रुग्णालयातील खर्च आवाक्याबाहेर गेल्याने तेथे उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे रुग्णाला कोरोना नसल्याचे चाचणी स्पष्ट झाले. मात्र, स्वाइन फ्लूचे निदान झाले. एकाच वेळी कोरोना आणि स्वाइन फ्लूच्या विषाणूंनी रुग्णाच्या फुफ्फुसांवर हल्ला केला होता. त्यातून न्यूमोनिया होऊन रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. कोरोना विषाणूंचा उद्रेक कमी झाल्यानंतर आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदले आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास बोरसे म्हणाले, ‘‘स्वाइन फ्लूच्या खूप मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत नाहीत. पण, काही रुग्णांना या विषाणूंच्या संसर्गाचे निदान होत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या अत्यल्प होती. मात्र, सध्या पावसामुळे होणारे थंड आणि पाऊस उघडल्यानंतरचे होणाऱ्या गरम वातावरणाचा अनुभव घेत आहोत. स्वाइन फ्लूच्या वाढीस हे वातावरण पोषक असते. त्यामुळे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. कोरोना आणि स्वाइन फ्लू अशा संसर्गाचे खूप कमी रुग्ण आढळले आहेत.’’
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘‘राज्यात १ जानेवारी ते २६ जुलै या दरम्यान स्वाइन फ्लूचे २९३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या शहरांमध्ये उपचार सुरू आहेत. या वर्षी आतापर्यंत या आजाराने नऊ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून, त्यापैकी चार रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत.’’

राज्यातील स्वाइन फ्लू (आकडेवारी १ जानेवारी ते २६ जुलैपर्यंतची)
जिल्हा ......................... रुग्ण ........... मृत्यू
मुंबई ............................ १०० .............. ०
पुणे .............................. ४५ ................. ४
ठाणे मनपा ................... ३३ .................. २
कल्याण ........................ ९ .................... ०
पालघर .......................... ३३ .................. ०
कोल्हापूर ....................... २७ ................... ३
नाशिक ......................... २७ ..................... ०
नागपूर मनपा ................. १४ .....................०
नवी मुंबई .........................३ .................... ०
वसई विरार ....................... २ .....................०

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83938 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..