
राष्ट्रीय लोक अदालतीचे १३ ऑगस्ट रोजी आयोजन
पुणे, ता. २८ : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने १३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रलंबित असलेली दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कलम १३८ निगोशिएबल इंन्स्टुमेंट्स अॅक्ट, भूसंपादन, कौटुंबिक प्रकरणे, औद्योगिक कामगार व सहकार न्यायालयातील प्रकरणे, तसेच विविध बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था तसेच विविध ग्रामपंचायती व पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेतील घरपट्टी, पाणीपट्टीची प्रकरणे, बीएसएनएल, आयडिया, व्होडाफोन आदींकडे बाकी असलेल्या देयकांची दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरिता
अदालतीचे आयोजन केले आहे.
लोक अदालतमध्ये ठेवण्यात येणाऱ्या प्रकरणातील पक्षकारांना नोटिसा पाठविण्यात येत असून, तडजोडीने निकाली काढण्याची इच्छा असलेल्या पक्षकारांनी आपापल्या न्यायालयात तसा विनंती अर्ज करावा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेली तालुका विधी सेवा समिती कार्यालयाकडे संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप यांनी दिली.
--------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84312 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..