शाळांमध्ये रोटरी इंटरॅक्ट क्लबची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळांमध्ये रोटरी इंटरॅक्ट क्लबची स्थापना
शाळांमध्ये रोटरी इंटरॅक्ट क्लबची स्थापना

शाळांमध्ये रोटरी इंटरॅक्ट क्लबची स्थापना

sakal_logo
By

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट तर्फे, घोटावडे येथील न्यू इंग्लिश स्कूल, पिरंगुट इंग्लिश स्कूल व पौड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या शाळांत २०२२-२३ या वर्षासाठी ‘रोटरी इंटरॅक्ट क्लब’ची स्थापना करण्यात आली. क्लब तर्फे अध्यक्षा भाग्यश्री भिडे, डॉ. माधुरी घाटे, माजी अध्यक्ष रिटा कोठारी, निरंजन मथुरे, दीपाली मथुरे आदींनी कार्यक्रम आयोजित केला. क्लबच्या माध्यमातून ग्रामीण शाळेच्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकास व नेतृत्व कौशल्य, भविष्यातील कारकिर्दीसाठी मार्गदर्शन, वेळेचे नियोजन आदींचे प्रशिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय आहे, असे भिडे यांनी सांगितले.

मराठा महासंघाची शहर कार्यकारिणी जाहीर
पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे पुणे शहराध्यक्षपदी प्रा. वैभव शिळीमकर आणि महिलाध्यक्ष म्हणून सुवर्णा भरेकर यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली. पुणे शहर युवक अध्यक्षपदी मयुरेश पाटील, शहर कार्याध्यक्षपदी मुकेश यादव तर उपाध्यक्षपदी अभिजित ताठे यांची निवड झाली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार आणि राष्ट्रीय प्रवक्ते श्रीरंग बर्गे यांच्या उपस्थितीत पुरुष, महिला व युवक अध्यक्षांचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास संपर्क प्रमुख अनिल ताडगे, राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष संतोष नानवटे, प्रदेश युवक अध्यक्ष रणजित जगताप, प्रा. अविनाश ताकवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नरसोबावाडीतील शाळेला मदत
पुणे ः सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून कोल्हापूरजवळील नरसोबावाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना बॅंक ऑफ महाराष्ट्रमधील निवृत्त अधिकारी सुरेश परांजपे व स्नेहा परांजपे यांनी ३८ दप्तरे देणगी स्वरूपात दिले. त्याबद्दल श्री दत्त विद्या मंदिरातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच सदाशिव मालशे व सुहासिनी बिवलकर यांनीही शाळेसाठी आर्थिक मदत केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84432 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..