पथारी हे अतिक्रमण नव्हे : हरदीप पुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथारी हे अतिक्रमण नव्हे : हरदीप पुरी
पथारी हे अतिक्रमण नव्हे : हरदीप पुरी

पथारी हे अतिक्रमण नव्हे : हरदीप पुरी

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : अधिकृत नोंदणीकृत पथारी विक्रेते हे रस्त्यावर अतिक्रमण करीत नाहीत तर, ते एक स्वयंरोजगाराचे माध्यम आहे. हा घटक समाजात महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी नुकतेच केले.
पथारी व्यावसायिकांसाठी नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्सतर्फे नवी दिल्ली येथे १६ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यात पुरी बोलत होते. राज्यातील एकता समितीचे अध्यक्ष दीपक मोहिते यांनी त्यात भाग घेतला. या प्रसंगी मोहिते यांचा संघटनेतर्फे अध्यक्ष चंद्रप्रकाश सिंह यांच्या हस्ते सत्कार झाला. संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद सिंह, संगीता सिंह, राज्य समन्वयक गुरुनाथ सावंत, मुंबईतील दयाशंकर सिंग, जळगावचे होनाजी चव्हाण, नागपूरचे सुनील सूर्यवंशी, मालेगावचे रामचंद्र देवरे आदी उपस्थित होते. पथारी विक्रेत्यांच्या मदतीसाठी महापालिकांनी स्थानिक स्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार आदेश देणार असल्याचेही पुरी यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84438 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top