नूमवि मराठी शाळेत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नूमवि मराठी शाळेत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम
नूमवि मराठी शाळेत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम

नूमवि मराठी शाळेत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आणि दीप अमावस्येच्या निमित्त नूमवि मराठी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला. या निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या झेंड्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेच्या नावाचे अक्षर दीप लावून उपक्रम साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका विद्या सोनवणे, प्राजक्ता पारेकर, ज्योती अजमेरा, लीना घुगरे, स्नेहल पवार आणि नीता चक्रनारायण यांचा आयोजनात सहभाग होता. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धाही घेण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84544 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..