
कोथरूड : सुरक्षित प्रभाग शोधावे लागणार
कोथरूड विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. महापालिका निवडणुकीची प्रभागरचना करताना तत्कालीन महाविकास आघाडीने या विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष घेतल्याची चर्चा होती. हा विधानसभा मतदारसंघ आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, नीलिमा खाडे, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे यांचा मार्ग सुकर झाला आहे. तर, जयंत भावे, दीपक पोटे, सुशील मेंगडे, राजा बराटे यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा राहणार आहे. श्याम देशपांडे हे कमळ की धनुष्यबाणाचा झेंडा खांद्यावर घेणार याकडे लक्ष लागले आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर, काँग्रेसचे चंदू कदम आणि वैशाली मराठे यांचे मार्ग या आरक्षणाच्या सोडतीतून मोकळे झाले आहेत. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत २४ जागा या विधानसभा मतदारसंघात होत्या. या वेळी नऊ प्रभागांमधून २६ उमेदवार महापालिकेवर निवडून जाणार आहेत. आरक्षणामुळे अनेक उमेदवारांना आपले सुरक्षित प्रभाग सोडून अन्य प्रभागांचा पर्याय स्वीकारावा लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84730 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..