
महाविद्यालयांतील ‘एनएसएस’ आता सोशल मीडियावर
पुणे, ता. ३० ः महाविद्यालयीन तरुणांना उपक्रमांच्या माध्यमातून सोशल कनेक्ट ठेवणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) आता अधिकृत सोशल मीडिया अकाउंटही सुरू करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयांना राष्ट्रीय सेवा योजनेचे ट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्युब अकाउंट सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.
केंद्रीय युवा व क्रिडा मंत्रालयाने महाविद्यालयांतील एनएसएस समाजमाध्यमांद्वारे अधिक गतिशील व क्रियाशील करण्याचे निर्देश दिले आहे. या संबंधीच्या पत्रकात संचालक डॉ. प्रभाकर देसाई म्हणतात, ‘‘पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांपर्यंत मर्यादित न राहता महाविद्यालयांच्या एककाद्वारे केलेल्या समाजपयोगी उपक्रमाचे प्रसिद्धीकरण केले पाहिजे. महाविद्यालयात राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची छायाचित्रे व माहिती यावर अपलोड करावी. विद्यापीठाने ट्वीटर अकाउंटसंबंधी महाविद्यालयांना निर्देश दिले असून, सर्व समाजमाध्यमांवरील अकाउंटची माहितीही मागविली आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84931 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..