पीएमपीचे तोट्यातील २५ मार्ग बंद तर चार नवे मार्ग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMP Bus
पीएमपीचे तोट्यातील २५ मार्ग बंद चार नवे मार्ग सुरू; वीस मार्गांवर फेऱ्यांची वाढ

पीएमपीचे तोट्यातील २५ मार्ग बंद तर चार नवे मार्ग सुरू

पुणे - पीएमपी तोट्यातील २५ मार्ग बंद करणार आहे. तर ४ नवे मार्ग सुरू करीत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन २० मार्गांवर फेऱ्यांची संख्यादेखील वाढवली जाणार आहे. २ ऑगस्ट रोजी तोट्यातील मार्ग बंद केले जातील. तर येत्या तीन दिवसांत नव्या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. सध्या वेळापत्रकात बदल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तीन दिवसांत याची अंमलबजावणी होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

हे मार्ग बंद :

१. स्वारगेट-मिडीपॉइंट

२. मनपा भवन-आदित्य गार्डन सोसायटी

३. कात्रज-कोंढणपूर

४. तळजाई पठार-स्वारगेट

५. उरुळी कांचन-खामगाव

६. सासवड-उरुळी कांचन

७. हडपसर-उरुळी कांचन

८. स्वारगेट-कात्रज मार्गे लेकटाउन

९. वाघोली-न्हावी सांडस

१०. वाघोली-करंदीगाव

११. पुणे स्टेशन-ताडीवाला रस्ता

१२. निगडी-देहूगाव

१३. हिंजवडी फेज ३-इंटरसिटी फेज ३

१४. चिखली-हिंजवडी माण फेज ३

१५. भोसरी-पाबळगाव

१६. राजगुरुनगर-कडूस

१७. पिंपळे गुरव-काटेपुरम

१८. स्वारगेट-बोपदेव घाट मार्गे सासवड

१९. पिंपळे गुरव-शितळादेवी चौक

२०. हडपसर-फुरसुंगी हरपळेवस्ती

२१. हडपसर-फुरसुंगी शेवाळेवाडी

२२. यवत-सासवड

२३. शेवाळेवाडी-पिंपरीगाव

२४. डेक्कन-पिंपळे निलख

२५. डेक्कन-मिडीपॉइंट

सुरू होणारे नवे मार्ग -

  • हडपसर-वाघोली मार्गे इऑन आयटी पार्क

  • कात्रज-पुणे स्टेशन मार्गे गंगाधाम

  • स्वारगेट-नांदेड सिटी

  • मनपा भवन-खराडी

प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी पीएमपीने तोट्यातील २५ मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करीत असताना ४ नवे मार्गदेखील सुरू करीत आहोत. प्रवाशांच्या प्रतिसादावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85030 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punePMP Bus