भीमाशंकरला ‘पीएमपी’ची शटल सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमाशंकरला ‘पीएमपी’ची शटल सेवा
भीमाशंकरला ‘पीएमपी’ची शटल सेवा

भीमाशंकरला ‘पीएमपी’ची शटल सेवा

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकरला भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता पीएमपी प्रशासनाने भीमाशंकर मंदिर ते पार्किंग ठिकाणादरम्यान शटल सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. श्रावण महिन्यात दर रविवारी सकाळी आठ ते दर सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत ही शटल सेवा असणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने मंदिरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी वाहने थांबविली असल्याने भक्तांना येथून पायी जावे लागण्याची शक्यता होती. मात्र हे अंतर विचारात घेता प्रशासनाने पीएमपीला शटल सेवा सुरू करण्याची विनंती केली होती. यासाठी डिझेलवर धावणाऱ्या मिडीबसचा वापर होणार आहे. बसमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी एक ब्रेक डाऊन बसदेखील येथे उपलब्ध असणार आहे, असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85073 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..