कार चोरल्याप्रकरणी परप्रांतीयाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार चोरल्याप्रकरणी परप्रांतीयाला अटक
कार चोरल्याप्रकरणी परप्रांतीयाला अटक

कार चोरल्याप्रकरणी परप्रांतीयाला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : सोसायटीमध्ये पार्क केलेली कार चोरल्या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका सराईत परप्रांतीयाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सुरेश कालूराम उदानी (रा. राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत ६२ वर्षीय वृद्धाने फिर्याद दिली आहे. पाच ते सहा जानेवारी २०२२ या कालावधीत रात्री सव्वाआठ ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान कोथरूड परिसरात ही घटना घडली.
फिर्यादी यांनी त्यांची स्कॉर्पिओ ही कार पार्किंगमध्ये पार्क करून ठेवली असताना चोरट्याने ती चोरून नेली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी उदानी याला न्यायालयात हजर केले असता, त्याच्यावर इतर राज्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? त्याने अशा प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अजिंक्य शिर्के यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85082 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..