पहिल्या फेरीत ९२ हजार विद्यार्थ्यांना जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या फेरीत ९२ हजार विद्यार्थ्यांना जागा
पहिल्या फेरीत ९२ हजार विद्यार्थ्यांना जागा

पहिल्या फेरीत ९२ हजार विद्यार्थ्यांना जागा

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यातील एकूण ९७५ आयटीआयमध्ये एक लाख ४९ हजार २९२ जागा उपलब्ध आहेत. या जागांवरील प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ९२ हजार १४० विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट मिळालेली आहे.

व्यवसायाभिमुख शिक्षण आणि त्यातून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधींमुळे गेल्या काही वर्षात या अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. यंदा आयटीआयच्या प्रवेशासाठी तीन लाख आठ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यातील दोन लाख ४८ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवून प्रवेशाच्या पहिल्या फेरीत सहभाग घेतला होता. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने नुकतीच पहिल्या फेरीतील ॲलॉटमेंटची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार ‘कॅप’अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार ६७६ जागा, तर खासगीमध्ये ४२ हजार ९७ जागा उपलब्ध आहेत. त्याशिवाय खासगी आयटीआयमध्ये १३ हजार ५१९ जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीत त्यातील शासकीय आयटीआयमधील ७५ हजार ७९९ जागांवर, तर खासगी आयटीआयमधील १६ हजार ३४१ जागांवर विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट देण्यात आली आहे.

प्रवेशाची पाच वर्षांतील स्थिती :
तपशील : २०२२ : २०२१ : २०२० : २०१९ : २०१८
नोंदणी झालेले विद्यार्थी : ३,०८,४३९ : २,८८,५८८ : ३,१४,७४१ : २,८७,३६७
एकूण आयटीआयची संख्या : ९७५ : ९७६ : ९७८ : ९७४ : ९१५
शासकीय आयटीआयटीची प्रवेश क्षमता : ९३,६७६ : ९२,३३६ : ८२,८५५ : ९३,२१० : ९३,०६०
खासगी आयटीआयची प्रवेश क्षमता : ५५,६१६ : ५३,९४८ : ५५,२२० : ५४,९८८ : ४६,४३२
एकूण प्रवेश क्षमता : १,४९,२९२ : १,४६,२८४ : १,३८,०७५ : १,४८,१९८ : १,३९,४९२

राज्यातील पहिल्या फेरीचा तपशील (वर्ष २०२२) :
तपशील : शासकीय आयटीआय : खासगी आयटीआय : एकूण आयटीआय
आयटीआयची संख्या : ४१९ : ५५६ : ९७५
प्रवेशासाठी उपलब्ध जागा : ९३,६७६ : ५५,६१६ : १,४९,२९२
ॲलॉटमेंट झालेल्या जागा : ७५,७९९ : १६,३४१ : ९२,१४०

पुणे विभागातील प्रवेशाचा आढावा (२०२२) :
तपशील : शासकीय आयटीआय : खासगी आयटीआय : एकूण आयटीआय
आयटीआयची संख्या : ६१ : १३० : १९१
प्रवेशासाठी उपलब्ध जागा : १७,५६४ : १४,१२४ : ३१,६८८
ॲलॉटमेंट झालेल्या जागा : १४,१२१ : ४,४१२ : १८,५३३

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85140 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..