बिबवेवाडी परिसरातील आठ जुगार अड्ड्यांवर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबवेवाडी परिसरातील 
आठ जुगार अड्ड्यांवर छापा
बिबवेवाडी परिसरातील आठ जुगार अड्ड्यांवर छापा

बिबवेवाडी परिसरातील आठ जुगार अड्ड्यांवर छापा

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने शहरातील लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. बिबवेवाडी भागातील आठ जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच लॉटरी दुकानाचे मालक, कामगारांसह ९४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सामाजिक सुरक्षा विभागाने मागील आठवड्यात महापालिका भवनासमोरील ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला होता. त्यापाठोपाठ गुरुवारी बिबवेवाडी परिसरात सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली. बिबवेवाडी भागात ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे सुरू असल्याची खबर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, जुगार खेळणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘आओ चलो खिलाडी, खेल शुरू है बिबवेवाडी’ असे संदेश पाठविण्यात आले होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईत ८४ हजार ९३० रुपये रोख रक्कम, ३२ मोबाईल, २७ दुचाकी वाहने असा १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी याप्रकरणी ९४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर, श्रीधर खडके, अविनाश लोहोटे, राजश्री मोहिते, प्रमोद मोहिते, मनीषा पुकाळे, राजेंद्र कुमावत, अण्णा माने, इरफान पठाण यांच्या पथकाने केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85189 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top