चारित्र्य घडविणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता : डॉ. रामचंद्र देखणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारित्र्य घडविणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता : डॉ. रामचंद्र देखणे
चारित्र्य घडविणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता : डॉ. रामचंद्र देखणे

चारित्र्य घडविणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता : डॉ. रामचंद्र देखणे

sakal_logo
By

चारित्र्य घडविणाऱ्या शिक्षणाची
आवश्यकता : डॉ. रामचंद्र देखणे

पुणे ः ‘‘आज जीवनशिक्षण ही संकल्पनाच बाजूला पडत असून ‘पदवी शिक्षण’ हीच संकल्पना रूढ होते आहे. त्यामुळे जगण्याची मूल्ये संपत चालली आहेत. त्यासाठी चारित्र्य घडविणारे शिक्षण हवे आहे,’’ असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्रातर्फे शिक्षक पुरस्कार, बक्षिस वितरण आणि सर्व समाजातील पन्नास होतकरू विद्यार्थ्यांना सुमारे दोन लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी डॉ. देखणे बोलत होते. याप्रसंगी उद्योगपती कृष्णकुमार गोयल, संस्थेचे कार्यवाह विश्वनाथ भालेराव, केंद्र प्रमुख मकरंद माणकीकर, शैक्षणिक विभाग प्रमुख राजेंद्र देवधर उपस्थित होते. सन्मानपत्रांचे वाचन मोहना गद्रे, अनघा जोशी, शिरीष आठल्ये यांनी केले. मुग्धा पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे ः ‘प्रतिभावंत आणि कलावंतांना धर्म नसतो. अण्णा भाऊ साठे हे विश्व स्वातंत्र्याचे पाईक होते. त्यांनी ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विश्वात्मकता गौरवून संतत्व पूजले’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. वि. दा. पिंगळे लिखित आणि दूर्वा एजन्सीतर्फे प्रकाशित ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी दूर्वा एजन्सीचे शैलेंद्र कदम, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे, मसापचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर, क्रांतिसूर्य लहूजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले आदी उपस्थित होते. देवेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

‘सक्षम’ नृत्य कार्यक्रमाचे सादरीकरण
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित डॉ. स्वाती दातार प्रस्तुत ‘सक्षम’ या नृत्य कार्यक्रमात कथक आणि भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण केले. ‘समर्चना स्कूल ऑफ डान्स’च्या गुरू अंजली राजू यांच्या विद्यार्थिनी अनुरिया लाड, तन्वी श्रॉफ, तिस्या पलसोकर यांनी सामुहिक भरतनाट्यमच्या शिवस्तुती, तिल्लाना आणि पसायदान या रचना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर गुरू गिरीश मनोहर यांच्या ‘नादयोगी ब्लेन्ड ऑफ कथक’ संस्थेतर्फे गिरीश मनोहर, वेदांत दैठणकर आणि आभा आगाशे यांनी शिववंदना, चतरंगचे सादरीकरण केले. गुरू पूनम गोखले यांच्या ‘मुद्रा सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस्’च्या विद्यार्थिनी रुची वाघ, ऋतुजा उपासे, शिवांगी क्ककर, द्विती नायक आणि तनया भावे यांनी भरतनाटयम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भावे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85230 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..