बस-प्रवासी गणित जुळेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस-प्रवासी गणित जुळेना
बस-प्रवासी गणित जुळेना

बस-प्रवासी गणित जुळेना

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः शिवाजी रस्ता व बाजीराव रस्त्यावरून धावणाऱ्या पीएमपी बसच्या माध्यमातून रोज किमान ३५ हजार प्रवाशांची वाहतूक होते. मात्र, पुण्यदशमच्या २४ बसमधून २० हजार ४०० प्रवाशांचीच वाहतूक होणार आहे. त्यामुळे उर्वरित १५ हजार प्रवाशांना ताटकळत उभे राहवे लागत आहे.
पीएमपीने बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्यावरून केवळ पुण्यदशमची सेवा देण्याचा घेतलेला निर्णय प्रवाशांची डोकेदुखी वाढविणारा ठरला. चाळीस मिनिटे वाट पाहून देखील प्रवाशांना बस मिळत नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. रविवारी चार बस वाढविण्याचा घेतलेला निर्णय हा प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसणारा ठरला.

प्रवासी ३५ हजार, फेऱ्या ६००
बाजीराव व शिवाजी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे ३५ हजार आहे. पीएमपी २४ बसच्या माध्यमातून दिवसभरात ६०० फेऱ्या होत आहेत. एका फेरीत सुमारे ३४ प्रवासी प्रवास करतात. (उभे राहिलेले व बसलेले). ६०० फेऱ्यांचे विचार केला तर यातून २० हजार ४०० प्रवासी प्रवास करतील. उर्वरित सुमारे १४ हजार ६०० प्रवाशांनी काय करायचे. ते प्रवास कसे करणार याचे पीएमपीकडे उत्तर नाही.

प्रवाशांच्या सोयीकरिता रविवारपासून बसच्या संख्येत वाढ केली. चार बस वाढविल्याने १२८ फेऱ्या वाढणार आहे. याचा प्रवाशांना फायदा होईल.
- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

पीएमपीचा हा प्रवास आत्मनाशाकडे चालला आहे की काय असे वाटते. कोणताही अभ्यास न करता, सर्व्हेक्षण न करता निर्णय घेतला जात आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी लहान बस सोडणे हा तर्क अव्यवहार्य आहे.
- सुजित पटवर्धन, विश्वस्त, परिसर संस्था

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85260 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top