
राज्यात ‘बीए.४’, ‘बीए.५’चे ६२ रुग्ण सार्वजनिक आरोग्य विभाग ः सर्व रुग्ण बरे झाले असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट
पुणे, ता. १ : राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटचा नवीन उपप्रकार असलेल्या ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’चे ६२ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. त्यात ‘बीए.४’चे दहा आणि ‘बीए.५’चे ५२ रुग्णांची नोंद राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे झाली आहे. हे सर्व रुग्ण खडखडीत बरे झाले असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात डेल्टा प्रकारचा विषाणू होता. याची तीव्रता कमी झाल्यानंतर जानेवारीमध्ये ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंटचे डोके वर काढले. त्याचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ लागला. ही कोरोनाची तिसरी लाट ठरली. या नंतर आता ओमिक्रॉन या व्हेरियंटमध्ये बदल होऊन त्याचे उपप्रकार आढळून येत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरू असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारणातून (जिनोम सिक्वेंसिंग) दिसते. त्यात ‘बीए.२’ हा सहजतेने दिसत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ चे आढळत असल्याचे दिसते. त्या पाठोपाठ आता ‘बीए.२.७५’ हा उपप्रकार दिसून येत आहे.
दृष्टीक्षेपात राज्यातील कोरोना
- राज्यात ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ व्हेरीयंटचे ६२ रुग्ण तर ‘बीए.२.७५’चे ७९ रुग्ण
- बी जे वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेल्या अहवालानुसार राज्यात ‘बीए.५’चे ५२ आणि ‘बीए.४’चे १० रुग्ण
- याशिवाय ‘बीए.२.७५’ व्हेरीयंटचे ७९ रुग्ण
- यातील ‘बीए.२.७५’चे ८ रुग्ण सोलापूर येथील तर उर्वरित सर्व रुग्ण पुणे येथील आहेत.
- पुणे इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये यांची तपासणी
- या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा
- राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ रुग्णांची संख्या २५८ तर ‘बीए.२.७५’ रुग्णांची संख्या १९९
जिल्हानिहाय ‘बीए.४’ आणि ‘बीए. ५’चे रुग्ण
पुणे : १६३
मुंबई : ५१
ठाणे : १६
रायगड : ७
सांगली : ५
नागपूर : ८
पालघर : ४
कोल्हापूर : २
जिल्हानिहाय ‘बीए.२.७५’चे रुग्ण
पुणे : १२७
नागपूर : ३३
यवतमाळ : १२
सोलापूर : ८
मुंबई : ५
अकोला : ४
ठाणे : ३
वाशीम : २
अमरावती, बुलडाणा, जालना, लातूर, सांगली : प्रत्येकी १.
........
‘‘राज्यात १३ हजार तीन सक्रिय रुग्ण रुग्ण असले तरीही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय उपचार घ्या. मधुमेह, उच्च रक्तदाब अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांनी संसर्ग होणार नाही, यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे’’
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85329 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..