पुण्यात महिनाअखेरीस पावसाची विश्रांती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात महिनाअखेरीस पावसाची विश्रांती
पुण्यात महिनाअखेरीस पावसाची विश्रांती

पुण्यात महिनाअखेरीस पावसाची विश्रांती

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने महिनाअखेरीस अखेर विश्रांती घेतली. रविवारी (ता. ३१) शहर व परिसरात सकाळपासूनच सूर्यनारायणाचे दर्शन होत होते. तर दिवसभर अंशतः ढगाळ असणारे आकाश संध्याकाळी निरभ्र झाले होते. शहरातील सर्वच हवामान निरीक्षण केंद्रांवर या काळात शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मागील तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ शहरात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर ढगाळ हवामान आणि पावसाची रिपरिप यामुळे पुणेकर काही अंशी वरुणराजाला कंटाळलेही होते. शुक्रवार (ता. २९)पासून शहरात पावसाचा जोर जरी कमी झाला असला, तरी संध्याकाळी तासभर का होईना, धुवाधार पाऊस पडत होता. रविवारी मात्र यात खंड पडत, संध्याकाळी निरभ्र आकाशाची अनुभूती पुणेकरांनी घेतली. त्यामुळे ऐन साप्ताहिक सुटीच्या दिवशी पावसाच्या खाड्यामुळे नागरिकांनी पर्यटनाबरोबरच सणाच्या खरेदीला प्राधान्य दिले. पुढील पाच दिवस तरी शहरात आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाची उघडीप आणि अंशतः ढगाळ हवामानामुळे शहरातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. रविवारी सरासरी कमाल तापमान ३१.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85349 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top