‘डान्स फेस्टिव्हल’मध्ये कथक-भरतनाट्यमचे सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डान्स फेस्टिव्हल’मध्ये 
कथक-भरतनाट्यमचे सादरीकरण
‘डान्स फेस्टिव्हल’मध्ये कथक-भरतनाट्यमचे सादरीकरण

‘डान्स फेस्टिव्हल’मध्ये कथक-भरतनाट्यमचे सादरीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः ‘लाऊड अॅप्लॉज’ या डान्स मॅगझीनतर्फे आयोजित ‘लाऊड अॅप्लॉज डान्स फेस्टिव्हल’मध्ये कथक आणि भरतनाट्यम या नृत्यप्रकारांचे बहारदार सादरीकरण झाले. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत तरुण कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ज्येष्ठ नृत्यगुरु स्वाती दैठणकर, डॉ. परिमल फडके, नृत्यांगना शर्वरी जेमनीस, प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते. ‘लाऊड अॅप्लॉज’ या डान्स मॅगझीनच्या संपादक आणि ‘कथक पाठशाला’च्या संस्थापक नेहा मुथियान यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेच्या श्वेता राजोपाध्ये, निकीता कुलकर्णी, पल्लवी अभ्यंकर, सानिका चव्हाण, अभिषेक धावडे, कीर्ती कुरांडे, ईशा नानल, पूजा भट्टड, अनंगा मंजिरी, रिद्धी पोतदार, अथर्व चौधरी, वैष्णवी पुणतांबेकर आदी यात सहभागी झाले होते. रुचा ढेकणे यांनी सूत्रसंचालन केले. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85443 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..