बँक ऑफ महाराष्ट्रला पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँक ऑफ महाराष्ट्रला पुरस्कार
बँक ऑफ महाराष्ट्रला पुरस्कार

बँक ऑफ महाराष्ट्रला पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १ : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने अभियान कालावधीत आपले लक्ष्य साध्य केल्याबद्दल केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते ‘कृषी पायाभूत सुविधा निधी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्राच्या कृषी, वित्तीय विभाग व राज्य अग्रणी बँक समिती विभागाचे सरव्यवस्थापक विजय कांबळे यांनी बँकेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्ली येथील पुसा मार्गावरील एन. ए. एस. संकुलातील ए. पी. शिंदे सभागृहात हा पुरस्कार समारंभ पार पडला. सूक्ष्म व छोट्या उद्योगांच्या पतहमी निधीकडून (सीजीटीएमएसई) व्याज अनुदान व पत हमीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पाठबळाने व्यवहार्य उपजोत्तर व्यवस्थापनासाठी पायाभूत व सामुदायिक कृषी सुविधा निर्माण करण्यासाठी मध्यम व दीर्घ मुदतीची वित्तीय साहाय्य सुविधा देण्याचा कृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे प्रयत्न आहे, असे बँकेकडून कळविण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85558 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..