दिव्यांग जागृती कट्ट्याचे आयोजन जिल्हानिहाय व्हावे : विजय कान्हेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग जागृती कट्ट्याचे आयोजन जिल्हानिहाय व्हावे : विजय कान्हेकर
दिव्यांग जागृती कट्ट्याचे आयोजन जिल्हानिहाय व्हावे : विजय कान्हेकर

दिव्यांग जागृती कट्ट्याचे आयोजन जिल्हानिहाय व्हावे : विजय कान्हेकर

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः दिव्यांगाचे कायदे व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रचार प्रसाराकरिता विविध उपक्रम आणि चर्चा सत्र प्रत्येक जिल्हात होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांनी व्यक्त केली.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र तथा सल्ला व मार्गदर्शन केंद्राने दिव्यांग जागृती या खुल्या चर्चासत्राचे ऑनलाइन आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका मांडली. दिव्यांगत्व प्रमाणपत्र व युडीआयडी वितरण प्रक्रियेच्या राज्य समन्वयक अंजली कान्हेकर, रोहिणी मोरे, महेश गिरी, अशोक सोळंके, रमेश मुसुडगे, कृष्णा शिरसाट आदी उपस्थित होते. दयानंद विश्वकर्मा यांनी दिव्यांगांच्या समस्या मांडल्या. केंद्राचे समुपदेशक हरिदास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अमेय अग्रवाल यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85609 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top