लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या - भगवान वैराट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या - भगवान वैराट
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या - भगवान वैराट

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या - भगवान वैराट

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः ‘‘केवळ दीड दिवसाची शाळा शिकून अण्णा भाऊ साठे यांनी उच्च दर्जाची साहित्य निर्मिती केली. आज केवळ देशातच नव्हे, तर पाश्चात्त्य देशांमध्ये देखील अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि व्यक्तिमत्वावर डॉक्टरेट केली जात आहे. असे असूनही अण्णा भाऊ साठे यांची देशात उपेक्षा होते. ती थांबवून अण्णा भाऊ साठे यांना तातडीने भारतरत्न हा पुरस्कार जाहीर करावा,’’ अशी मागणी महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान वैराट यांनी केली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, या मागणीसाठी अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव ते सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत क्रांती ज्योत काढण्यात आली. त्या ज्योतीचे आणि आंदोलनकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी लेखिका अनघा भट, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा, चंद्रशेखर पिंगळे, शहर मातंग समितीचे स्वागताध्यक्ष शंकर शेडगे, सचिव विकास सातारकर, महम्मद शेख, शिवाजी भिसे, जलसा वैराट, राजू वेळणूर, सुनीता जाधव, राजाभाऊ शिंदे, हरिभाऊ वाघमारे, रोहित वैराट, दत्ता कांबळे, सुरेखा भालेराव, गणेश लांडगे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85638 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..