
अवती भवती
‘सेंट्रल बिल्डींग लगतच्या जागेवर
हातगाडी चालकांना पुन्हा परवानगी द्या’
पुणे, ता. १ ः सेंट्रल बिल्डींग लगत असलेल्या जागेवर स्थिर हातगाडी चालकांना पुन्हा बसण्याची परवानगी द्यावी. या मागणीसाठी भारतीय व्यापारी असोसिएशनतर्फे महानगरपालिकेला विरोधात धरणे आंदोलन केले जाणार आहे. असे असोसिएशनचे अध्यक्ष इस्माईल शेख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस भवनसमोर ५ ऑगस्ट तर महानगरपालिकेसमोर १० ऑगस्टला धरणे आंदोलन केले जाईल, असे शेख यांनी सांगितले.
यावेळी असोसिएशनचे अनंत सांवत, बाबूराव पाटील, शरद अडागळे, सलीम सय्यद आदी उपस्थित होते. शेख म्हणाले, ‘‘महापालिकेने २१ वर्षापूर्वी सेंट्रल बिल्डींग लगतच्या जागेवरून उठवून तात्पुरती राजीव गांधी रस्त्या, माल धक्का येथे जागा दिली. मात्र ग्राहक येत नसल्याने धंदा होत नाही. तसेच ज्या जागेवरून उठवले, त्या जागेवर राजकीय मर्जितल्या व्यक्तींना धंद्यासाठी बसविले जात आहे. त्यामुळे आम्हाला आमची हक्काची जागा पुन्हा देण्यात यावी.’’
राष्ट्रीय युवा महामोर्चाची स्थापना
पुणे, ता. १ ः भारतीय एकता मोर्चा, शिवराज्यराष्ट्र प्रतिष्ठान, भीम क्रांती मोर्चा, ओबीसी महासेना, ऑल इंडिया आंबेडकरी सेना, आगरी कोळी युवा महासंघ, बहुजन युथ फ्रंट आदी संघटना विलीन करून राष्ट्रीय युवा महामोर्चा राष्ट्रव्यापी संघटनेची स्थापना केली, अशी माहिती महामोर्चाचे अध्यक्ष रोशन पाटील यांनी दिली. यावेळी कुमार गायकवाड, महावीर वजाळे आदी उपस्थित होते. महापुरुषांच्या विचारांनी व्यवस्था परिवर्तन करणे, संविधानाचे शंभर टक्के अंमलबजावणी करणे, सर्व जाती समूहांना संघटित करणे आदी ध्येय व उद्देश असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85659 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..