सकाळ पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ पुस्तक प्रकाशन
सकाळ पुस्तक प्रकाशन

सकाळ पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

आयुष्याला धैर्याने सामोरे जाण्याची ऊर्जा देणारं पुस्तक : सुहृद ज्योती
सकाळ प्रकाशनाच्या "सुहृद ज्योती" पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे, ता. १ ः असाध्य रोगाशी झुंज देत, ‘हृदय-ज्योत’ संस्थेच्या माध्यमातून अनेकांना जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या ज्योती मुंगसे हिच्या प्रेरणादायी कहाणीवर आधारित डॉ. प्रतिभा देशपांडेलिखित ‘सुहृद ज्योती’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी झाले. ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय खरात, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख या प्रसंगी उपस्थित होते. आयुष्याला धैर्याने सामोरे जाण्याची, सकारात्मक ऊर्जा देणारे ‘सुहृद ज्योती’ हे पुस्तक असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
लागू म्हणाल्या, ‘हृदयरोगासारख्या दुर्धर आजाराला ज्योती जिद्दीने, धैर्याने सामोरी गेली, तिच्या त्या जिद्दीला सलाम! ज्या प्रेमाने तिने इतर रुग्णांना आजाराला सामोरे जाण्याचे धैर्य दिले ते कौतुकास्पद होते.’’
‘‘ज्योतीला हृदयरोगामधील ‘पल्मनरी हायपरटेन्शन’ हा असाध्य आजार होता. यात फार तर ४ ते ६ महिन्यांचे आयुष्य असते. पण वैद्यकशास्त्राला खोटे ठरवत ती चक्क ४६ वर्षांचे आयुष्य जगली. त्यामुळे हा समारंभ म्हणजे एका जिद्दी आयुष्याचे सेलिब्रेशन आहे,’’ असे उदगार डॉ. हिरेमठ यांनी काढले.
डॉ. देशमुख यांनी मुंगसे कुटुंबाशी असलेल्या कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. डॉ. खरात यांनी ऑक्सिजन लावून एमएची परीक्षा देणाऱ्या आणि महाविद्यालयात प्रथम येणाऱ्या ज्योतीचे उदाहरण आदर्श विद्यार्थी म्हणून आम्ही आजही विद्यार्थ्यांना देत असतो, असे त्यांनी सांगितले. ‘ज्योतीच्या संघर्षमय प्रवासाचा पहिला लेख दैनिक ‘सकाळ’ने १३ ऑक्टोबर २००३ ला प्रसिद्ध केला होता. त्यातून ज्योतीच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. आता ‘सुहृद ज्योती’ पुस्तक रूपाने तिचे प्रेरणादायी आयुष्य ‘सकाळ प्रकाशन’ने वाचकांसमोर आणले आहे, असे ‘सकाळ’ प्रकाशनच्या दीपाली चौधरी यांनी सांगितले.
ज्योतीचे वडील डॉ. हरिभाऊ मुंगसे यांनी मनोगतातून तिच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. जयश्री खर्चे यांनी सूत्रसंचालन केले. तर स्वाती मुंगसे यांनी आभार मानले.

‘सुहृद ज्योती’ (Cover photo घेणे.)
असाध्य रोगाशी झुंज देत, ‘हृदय-ज्योत’ संस्थेच्या माध्यमातून अनेकांना जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या ज्योती मुंगसे हिची प्रेरणादायी कहाणी.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८८८८८४९०५० / www.sakalpublications.com

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85685 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..