तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी एकत्र येणे आवश्यक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी एकत्र येणे आवश्यक!
तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी एकत्र येणे आवश्यक!

तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी एकत्र येणे आवश्यक!

sakal_logo
By

पुणे, ता. २ : मुलांमधील व्यसनाधीनतेचे प्रश्न दिवसागणिक गंभीर होत आहे. तरुण पिढीला व्यसनाधिनतेच्या या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत राज्याचे महिला आणि बालकल्याण विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांनी व्यक्त केले.

ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील १३ ते १६ वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ‘व्यसन परावृत्ती’ विषयी जागृती करण्याच्या हेतूने ‘संयम’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संशोधन संस्थेतील तज्ज्ञांच्या ‘अभ्यास संशोधन’ अहवालाचे प्रकाशन झाले. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त नंदकिशोर राठी, रतन राठी, दर्शन मुंदडा, ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. अनघा लवळेकर आदी उपस्थित होते. परिसंवादात समुपदेशक अनुराधा करकरे म्हणाल्या,‘‘विविध टप्प्यांवर मुलांच्या भावनांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मूल्यशिक्षण महत्त्वाचे ठरते. मूल्यशिक्षणाला आध्यात्मिक तत्त्वांची जोड दिल्यास मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.’’ मल्हार पांड्ये म्हणाले की, तरुण वयात समवयस्क मित्र-मैत्रिणीच्या दबावामुळे अनेक जण व्यसनाकडे वळतात. मात्र, व्यसनाच्या आहारी गेलेल्या आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला याच दबावाचा सकारात्मक वापर करून व्यसनाच्या विळख्यातून बाहेरही काढता येते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85783 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..