भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात पेटंटविषयी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात पेटंटविषयी कार्यशाळा
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात पेटंटविषयी कार्यशाळा

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात पेटंटविषयी कार्यशाळा

sakal_logo
By

पुणे, ता. २ : लवळे येथील भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्टॅच्युअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट यांच्या सहकार्याने ‘बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) पेटंट'' विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळा घेतली. राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियानांतर्गत ही कार्यशाळा घेतली गेली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या पेटंट कार्यालयात पेटंट आणि डिझाइनचे उपनियंत्रक डॉ. पंकज बोरकर यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आयपीआर विद्यार्थ्यांना त्यांचा बायोडेटा समृद्ध करण्यासाठी कशी मदत करू शकतो, यावर बोरकर यांनी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर आयोजन समन्वयक व सहाय्यक प्राध्यापिका डॉ. ज्योती ढाणके यांनी केले. प्रा. प्रशांत कदम, ओम अडमिले, आरिया अरोरा, याशिका अग्रवाल, सेजल गेडाम आदी या वेळी सहभागी झाले होते. कार्यशाळेला देश-विदेशातील विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85918 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top