पुण्यातून ‘रॉयल राजस्थान’ रेल्वे २७ ऑक्टोबरपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातून ‘रॉयल राजस्थान’  रेल्वे २७ ऑक्टोबरपासून
पुण्यातून ‘रॉयल राजस्थान’ रेल्वे २७ ऑक्टोबरपासून

पुण्यातून ‘रॉयल राजस्थान’ रेल्वे २७ ऑक्टोबरपासून

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटी) पर्यटकांसाठी ‘रॉयल राजस्थान स्वदेश दर्शन पर्यटन रेल्वे गाडी’ सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही गाडी पुणे स्थानकावरून २७ ऑक्टोबर रोजी सुटणार आहे, अशी माहिती ‘आयआरसीटी’ पश्‍चिम विभागाचे अप्पर मुख्य प्रबंधक राजीव जैन यांनी दिली. यावेळी स्टेशन डायरेक्टर सुरेश जैन, व्यवस्थापक रविकांत जंगले, सुभाष नायर उपस्थित होते.

राजीव जैन म्हणाले, ‘‘उत्तर भारत आणि दक्षिण भारतात पर्यटनाला जाण्यासाठी विशेष पॅकेज तयार केले आहे. पर्यंटकासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांना मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, प्रवाशांचा रेल्वेवरील विश्वास वाढत आहे.’’ प्रथमच पुणे स्थानकातून पर्यटकांसाठी ‘रॉयल राजस्थान’ ही पर्यटन रेल्वे सोडण्यात येणार आहे. उदयपूर, जयपूर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर या मुख्य ठिकाणांना भेट दिली जाणार आहे. ही यात्रा पाच रात्र आणि सहा दिवसांची असेल. यासाठी ‘आयआरसीटी’ने स्टँडर्ड, बजेट आणि कम्फर्ट हे विशेष पॅकेज तयार केले आहे. या गाडीची तिकीट बुकिंग सेवा सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी आणि तिकीट बुकिंगसाठी ‘आयआरसीटी’च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, पुणे रेल्वे स्थानकाच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जंगले यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86108 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top