फसवणूक प्रकरणी एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूक प्रकरणी एकास अटक
फसवणूक प्रकरणी एकास अटक

फसवणूक प्रकरणी एकास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २ : विकसनाच्या कराराप्रमाणे सदनिकेचा ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी एकास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास चार ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. योगेश सुरेश नलावडे (वय ३६, सार्इ स्मृती अपार्टमेंट, झांबरे तालीम जवळ, कसबा पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत सुनील कांतिलाल संचेती (वय ५९, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली. चार जुलै २०१५ पासून हा प्रकार सुरू होता. कसबा पेठेतील एका जागेच्या विकसनाच्या कराराप्रमाणे फ्लॅटचा ताबा न देता तो परस्पर दुसऱ्याला विकला, अशी फिर्याद देण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अजिंक्य शिर्के यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86120 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top