‘पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच बैठक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पुण्यातील वाहतूक कोंडी 
सोडविण्यासाठी लवकरच बैठक’
‘पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच बैठक’

‘पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच बैठक’

sakal_logo
By

पुणे, ता. २ : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी रिंगरोड, नगर ते वाघोली रस्त्यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, सार्वजनिक बांधकाम आणि पीएमआरडीए यांची लवकरच एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले.

पुणे विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली. या वेळी आमदारही उपस्थित होते. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी संदर्भात काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भातील माहिती घेतली. त्याचवेळी नगर ते चाकण दरम्यान रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली. तर महापालिकेने ३४ गावांत खासगी सहभागातून काही रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असल्याचे सांगितले. शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी विविध एजन्सींकडून कामे सुरू आहेत. त्यामध्ये सुसूत्रता यावी आणि कामे गतीने मार्गी लागावीत, यासाठी सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे लवकरच या संदर्भात सर्व संबंधित घटकांची एकत्रित बैठक घेऊ, असे आश्‍वासन शिंदे यांनी दिले.

पाणीपुरवठा योजनेची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हवेली तालुक्यातील तुकाई टेकडी येथे फुरसुंगी-ऊरळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची भेट देऊन पाहणी केली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, पाणीपुरवठा मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86143 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..