ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणासाठी परवड ः गोळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणासाठी परवड ः गोळे
ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणासाठी परवड ः गोळे

ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणासाठी परवड ः गोळे

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः ‘‘ग्रामीण भागात गेल्यावर तिथल्या गंभीर समस्या आपल्याला दिसतात. तेथील मुलांना शिक्षणासाठी धडपड करावी लागते. सोई-सुविधांचा अभाव असतो. हे वास्तव ‘सुमी’ चित्रपटातून मांडले आहे. ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’मुळे या चित्रपटाद्वारे दाखविलेल्या गंभीर विषयाकडे समाजाचे लक्ष वेधले जाईल,’’ असे मत दिग्दर्शक अमोल गोळे यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार पटकाविणाऱ्या ‘सुमी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गोळे, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार प्राप्त आकांक्षा पिंगळे, बाल कलाकार दिव्येश इंदुलकर यांच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी याप्रसंगी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट व सरचिटणीस पांडुरंग सरोदे उपस्थित होते.

गोळे म्हणाले, ‘‘नशीबवान, रंगा-पतंगा, पावनखिंडच्या यशानंतर चांगला विषय मांडता आला. सुमीची कथा परिक्षकांना आवडली. दिव्येश दिव्यांग आहे, त्यामुळे अजय देवगणला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा मला दिव्येशचा पुरस्कार मोलाचा वाटतो.’’ आकांक्षा म्हणाली, ‘‘चित्रीकरणावेळी थोडी भीती वाटली. मात्र, अमोल सरांचे चांगले मार्गदर्शन लाभले. सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आई-वडील खूप आनंदात होते. वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद वाटतो.’’

दिव्येश म्हणाला, ‘‘कानात श्रवणयंत्र असल्याने चित्रीकरणावेळी अनेकदा चुका व्हायच्या. परंतु, अमोल सरांसह संपूर्ण टीमने मला सांभाळून घेतले. ऐकू येत नसले तरी त्याचा फारसा परिणाम चित्रिकरणावर झाला नाही. पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच सर्वप्रथम आई-बाबांना व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर त्यांना रडू कोसळले.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86163 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top