पहिल्या दिवशी ३३८८ प्रवेश निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या दिवशी ३३८८ प्रवेश निश्चित
पहिल्या दिवशी ३३८८ प्रवेश निश्चित

पहिल्या दिवशी ३३८८ प्रवेश निश्चित

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या नियमित फेरीत तब्बल ४२ हजार ७०९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची महाविद्यालये मिळाली आहेत. यामध्ये जवळपास निम्म्याहून अधिक म्हणजेच ५७.८७ टक्के विद्यार्थ्यांची पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी निवड झाली आहे. तर प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी तीन हजार ३८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३१७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) ८६ हजार ७२५ जागांसाठी ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशाच्या पहिल्या नियमित यादीत तब्बल २४ हजार ७१८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या यादीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या शनिवारपर्यंत (ता. ६) प्रवेश घेता येणार आहे. महाविद्यालय अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. तसेच मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा, अशी सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. तसेच, पहिल्या फेरीच्या निवड यादीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्या संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. पण पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास किंवा प्रवेश नाकारल्यास, त्या विद्यार्थ्यांना पुढील एका प्रवेश फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल, असेही शिक्षण विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
पहिल्या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यासाठी महाविद्यालयांना शनिवारी रात्री आठपर्यंत मुदत दिली आहे. प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीसाठी उपलब्ध जागा रविवारी (ता. ७) प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या :*
पसंतीक्रम : ॲलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
१ : २४,७१८
२ : ६,८२०
३ : ३,५१५
४ : २,४११
५ : १,६६७
६ : १,१८५
७ : ८८९
८ : ६४०
९ : ४९२
१० : ३७२

पहिल्या यादीत शाखानिहाय महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
शाखा : प्रवेशाच्या जागा : ॲलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
कला : १६,९८० : ४,१९७
वाणिज्य : ४४,८७५ : १६,१४१
विज्ञान : ४५,८१० : २१,५३४
एचएसव्हीसी : ३,७६५ : ८३७

पसंतीक्रमनिहाय प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
महाविद्यालयांचा पसंतीक्रम : प्रवेश घेतलेले विद्यार्थी
१ : ३,४११
२ : २८२
३ : ७२
४ : ३९
५ : २१

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86341 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top