राजकीय पक्षांत थोडी खुशी-थोडा गम दोन्ही काँग्रेस न्यायालयात जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय पक्षांत थोडी खुशी-थोडा गम
दोन्ही काँग्रेस न्यायालयात जाणार
राजकीय पक्षांत थोडी खुशी-थोडा गम दोन्ही काँग्रेस न्यायालयात जाणार

राजकीय पक्षांत थोडी खुशी-थोडा गम दोन्ही काँग्रेस न्यायालयात जाणार

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : महापालिकेची सदस्य संख्या सुधारण्याचा आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाने राजकीय पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाचे भाजप आणि शिंदे गटातील इच्छुकांकडून स्वागत होत आहे. तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत मात्र नाराजी पसरली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा हलचाली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केल्या आहेत. न्यायालयीन लढाई झाल्यास निवडणूका वेळेत होणार की आणखी लांबणीवर पडणार यावरून तर्कविर्तक लढविले जात आहेत.

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार जाणीवपूर्वक सोईसाठी असा निर्णय घेते आहे. त्या विरोधात पक्षाच्या वतीने न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.
- अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस

सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देणारा हा निर्णय आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे काम राहिले आहे. पुण्यासह राज्यातील १४ महापालिकांमध्ये लोकशासन आणण्याऐवजी प्रशासक राज सुरू ठेवण्याची इच्छा भाजपची दिसते आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला पक्षाच्या वतीने न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.
- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

आगामी महापालिका निवडणुका २०१७ च्या प्रभागरचनेप्रमाणे घेण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. महाविकास आघाडीने नवीन जनगणना झाली नसताना लोकसंख्येच्या आधारे राजकीय स्वार्थापोटी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभागांची मोडतोड केली होती.
- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप

या निर्णयाचे मी स्वागत करतो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून येतील.
- प्रमोद भानगिरे, शहरप्रमख, शिवसेना (शिंदे गट)

प्रभागरचना कशीही केली तरी मनसे त्यासाठी तयार आहे. परंतु पक्षाची भूमिका ही एक वॉर्ड रचना असली पाहिजे अशीच आहे.
-साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे

चारच्या प्रभागाशिवाय भाजपची सत्ता येऊ शकत नाही, हे त्यांच्या नेत्यांना माहिती आहे. त्यामुळेच काहीही करून सत्ता मिळविण्यासाठी भाजपने केलेली ही धडपड आहे.
- बाळा ओसवाल, प्रवक्ते, शिवसेना

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86480 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top