पुणे महापालिकेत गणेशोत्सवाची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महापालिकेत गणेशोत्सवाची बैठक
पुणे महापालिकेत गणेशोत्सवाची बैठक

पुणे महापालिकेत गणेशोत्सवाची बैठक

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः गणेशोत्सव जवळ आल्याने त्यासंदर्भात महापालिका, पोलिस आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय असावा, यासाठी व मंडळांच्या प्रश्‍नावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी (ता. ८) महापालिकेत बैठक आयोजित केली आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा होऊ शकला नव्हता, पण यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे सोमवारी महापालिका भवनातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संयुक्त बैठक आयोजित केली आहे. परवाने, कमानी, मांडव, स्वागत कक्ष, रस्त्यावरील खड्डे यांसह इतर विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच मंडईमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे, त्यामुळे यंदा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करण्याची जागा बदलण्याची शक्यता आहे, त्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86492 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..