अत्याचार करणाऱ्या तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अत्याचार करणाऱ्या तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी
अत्याचार करणाऱ्या तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी

अत्याचार करणाऱ्या तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला विशेष न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला.
गणेश सखाराम कदम (वय २७, रा. तळवडे, मूळ रा. बीड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात बलात्कार, अपहरण आणि पॉक्सो कायद्याच्या कलमान्वये चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलीच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २१ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास तळवडे परिसरातून मुलीचे अपहरण केले होते. घटनेच्या दिवशी कदम याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आधी पंढरपूर व त्यानंतर शिर्डी येथे नेले. तिथे भाडेतत्वावर घेतलेल्या खोलीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला पाटोदा बस थांब्यावरून ताब्यात घेतले. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी गणेश विरोधात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नीलेश दरेकर यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86591 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..