
‘कॉम्प्युस्किल्स चॅम्पियनशिप २०२२’ आंतरशालेय संगणककौशल्य स्पर्धा
पुणे, ता. ४ : रास्ता पेठेतील आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन व युनियन बँक ऑफ इंडिया, मास्टरकार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरशालेय कॉम्प्युस्किल्स चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धा घेण्यात येत आहे.
स्पर्धेचे हे अकरावे वर्ष असून गेल्या दहा वर्षांत पुणे, महाराष्ट्र, गुजरात तसेच अमेरिका आणि ब्राझील येथील संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविलेला आहे. विद्यार्थ्यांचे संगणकीय कौशल्ये व सर्जनशीलतेला अधिकाधिक वाव मिळावा, यासाठी ‘कॉम्प्युस्किल्स चॅम्पियनशिप २०२२’ ही स्पर्धा भरविण्यात येते. यामध्ये सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन सुभाष परमार यांनी केले आहे. ही स्पर्धा ‘स्क्रॅच’ या प्रोग्रॅमिंग भाषेत घेण्यात येईल. www.scratch.mit.edu या संकेतस्थळावर हे सॉफ्टवेअर निःशुल्क उपलब्ध आहे. स्पर्धेत पाचवी ते दहावीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची अधिक माहिती शाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86592 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..