Maharashtra Weather : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण, या भागात मुसळधार पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Weather Chance of heavy rain in the area
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

Maharashtra Weather : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण, या भागात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असून, मॉन्सूनच्या पावसाची पुन्हा सुरुवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवारी (ता. ५) दक्षिण कोकणात जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गेल्या दहा ते १२ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून, तो राजस्थान ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.

तसेच राजस्थान व परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून वायव्य बंगालच्या उपसागरात येत्या रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची चिन्हे आहेत. यामुळे राज्यात पाऊस सक्रिय होताना दिसून येत आहे. राज्यात पुढील चार दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तसेच किनारपट्टीलगत सोसाट्याचे वारे वाहतील, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात येत्या शनिवारपासून (ता. ६) पावसाचा जोर वाढू शकतो. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारी (ता. ५) सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. ५) पावसाचा येलो अलर्ट
रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

राज्यातील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)
नाशिक ः २७
सातारा ः १९
रत्नागिरी ः ५
नागपूर ः ४
औरंगाबाद, जळगाव ः ३

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86811 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..