पुण्यात ‘ट्रॅव्हल ट्रेड रोड शो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात ‘ट्रॅव्हल ट्रेड रोड शो’
पुण्यात ‘ट्रॅव्हल ट्रेड रोड शो’

पुण्यात ‘ट्रॅव्हल ट्रेड रोड शो’

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : आंतरराष्ट्रीय पर्यटनाला वेग आला असताना सिंगापूर टुरिझम बोर्डाने (एसटीबी) पुण्यात डीपनिंग कनेक्शन्स, अचिव्हिंग टुगेदर या ‘ट्रॅव्हल ट्रेड रोड शो’चे आयोजन केले होते. पाच शहरांच्या रोड शो मालिकेचा एक भाग म्हणून एसटीबी भारतातील व्यापार भागीदार-मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्याशी संलग्न होण्यासाठी ४० सिंगापूर पर्यटन भागधारकांचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे शिष्टमंडळ घेऊन आले आहे.

या व्यापार सहभाग कार्यक्रमात १८० हून अधिक ट्रॅव्हल एजंट पुण्यात उपस्थित होते. सिंगापूर पर्यटनाची भागीदारी अधिक सखोल करण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारक आणि स्थानिक प्रवासी व्यापार यांच्यात नवीन नेटवर्क वाढवायला चालना मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या रोड शोमध्ये सिंगापूरमधील काही प्रमुख आकर्षणे, हॉटेल, टूर ऑपरेटर, क्रूझ लाइन आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपन्या यांचा सहभागी होता. सिंगापूरला भेट देणाऱ्या भारतीय प्रवाशांची संख्या परत वाढविण्यासाठी सिंगापूर पर्यटन व्यापार आणि पुणे ट्रॅव्हल एजंट या दोघांनी आपापल्या बाजूने बांधिलकी दर्शविली. एसटीबी ही सिंगापूरच्या प्रमुख आर्थिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या पर्यटनासाठीची प्रमुख विकास संस्था आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86841 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..