
जाणून घ्या शेतजमीन कायदे
शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, ७/१२, फेरफार, गाव नकाशा, गाव नमुना इ. शेतजमीन विषयक कागदपत्रे कशी वाचायची, त्याचा उपयोग आणि वापर कसा करायचा, शेतजमिनीचे प्रकार, शेतजमीन खरेदी, कायदे आणि पळवाटा, महारेरा इ. याविषयी माहिती देणारी एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी (ता. १३) ‘एसआयआयएलसी’तर्फे सकाळनगर येथे सकाळी साडेदहा वाजता आयोजित केली आहे.
यामध्ये तलाठी, तहसील कार्यालयातील दस्तऐवज ऑनलाइन कसे मिळवावे, विविध ऑनलाइन उपलब्ध साधने कशी वापरावी इ.बद्दल रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करतील. आपण जमीन मालक, गुंतवणूकदार किंवा प्रॉपर्टी एजंट असाल, तर कार्यशाळा उपयुक्त ठरणारी आहे. चहा, जेवण आणि पार्किंगची सोय आहे. प्रति व्यक्ती शुल्क रुपये २,४९९ अधिक जीएसटी. कार्यशाळा मर्यादित ७५ जागांसाठी असून मराठी माध्यमातून होईल. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ७४४७४४३१९८/९८८१०९९४२६ किंवा https://tinyurl.com/siilc
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86979 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..