सेवाकाळात पॅरामेडिकललाही हवे विद्यावेतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवाकाळात पॅरामेडिकललाही हवे विद्यावेतन
सेवाकाळात पॅरामेडिकललाही हवे विद्यावेतन

सेवाकाळात पॅरामेडिकललाही हवे विद्यावेतन

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : त्र्यंबकेश्वरसारख्या आदिवासी तालुक्यातील सुनील पॅरामेडिकलच्या शिक्षणासाठी पुण्यात येतो. एका शासकीय महाविद्यालयात मेरीटवर त्याची निवड होते. शिक्षण घेणारा घरातील पहिलाच सदस्य थेट पुण्यात आल्याने कुटुंबासह संपूर्ण गावालाच आनंद होतो. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही सुनीलने तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. आता चौथ्यावर्षी तो इंटर्नशिप करत आहे. मात्र त्याला वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांप्रमाणे मानधन मिळत नाही. परिणामी, आजही त्याला रोजच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागत आहे.

सुनीलप्रमाणे राज्यातील सर्वच पॅरामेडिकलचे विद्यार्थी इंटर्नशिप काळात मानधनापासून वंचित आहे. कोरोनाकाळात सामाजिक बांधिलकी म्हणून वैद्यकीय अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. त्यांना मात्र मानधन मिळाले, हे विद्यार्थी मात्र वंचित राहिले. महेंद्र भोई सांगतो, ‘‘पॅरामेडिकलचे विद्यार्थी पदवी पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष शासकीय महाविद्यालयात सेवा देतात. रुग्णांची सेवा करणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांना शासनाचे कोणतेच मानधन मिळत नाही. या काळात राहणे, खाणे आणि इतर गोष्टींसाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच शासनाने आम्हालाही मानधन द्यावे.’’ बी.एस्सी. इन पॅरामेडिकल सर्व्हिसेस या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षी विद्यार्थी इंटर्नशिप करतात. शस्रक्रिया विभाग तंत्रज्ञ, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा इथपासून ते रक्तपेढी तंत्रज्ञांपर्यंत विविध पॅरामेडिकल सेवा उपलब्ध आहे.

पॅरामेडिकल सेवा म्हणजे काय?
डॉक्टरांबरोबर रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती. ज्यामध्ये परिचारिका, थेरपिस्ट, तंत्रज्ञ आणि वैद्यकीय सेवेमध्ये गुंतलेले इतर सहायक कर्मचाऱ्यांचाही समावेश होतो.

मागील चार वर्षांपासून आम्ही पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना मानधन मिळावे म्हणून शासनाच्या मागे लागलो आहोत. कोरोनाकाळात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रश्न लवकर मार्गी लावू असे सांगितले होते. मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
- राजेश जाधव, पॅरामेडिकल विद्यार्थी (नाव बदलले आहे)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87079 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..