
निर्मात्यांनी आत्मपरीक्षण करावे ः राजेभोसले
पुणे ः ‘‘चित्रपट महामंडळाकडे सात हजारांहून अधिक चित्रपट निर्मात्यांची नोंदणी आहे, मात्र पाचशेसुद्धा कार्यरत नाहीत. पुण्यातील दहासुद्धा सक्रिय नाहीत. नाट्यनिर्मिती संस्थाही सुमारे ५५ आहेत, मात्र पाचही सक्रिय नाहीत, हे वास्तव आहे. मुंबईचे निर्माते येतात आणि हाऊसफुल्लचा बोर्ड लावतात. आपण कुठे कमी पडत आहोत, याचा विचार निर्मात्यांनी करावा, असे मत नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले. स्वर सर्वेश प्रॉडक्शन आणि सर्वज्ञ नाट्य संस्था यांच्यातर्फे ‘जानम समझा करो’ आणि ‘वाजतंय ते गाजतंय’ या कार्यक्रमाच्या मुहूर्त सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी निर्माते संतोष चव्हाण, अभिनेते माधव अभ्यंकर, ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश देशमुख, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, अभिनेता चेतन चावडा, हेमंत एदलाबादकर आदी उपस्थित होते.
काव्यपूर्ती स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पुणे ः ‘साहित्य संघ, पुणे दक्षिण’तर्फे घेण्यात आलेल्या २१ व्या काव्यपूर्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला. या स्पर्धेच सोमेश कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक, डॉ. अंजनी कुलकर्णी यांनी द्वितीय क्रमांक, अमोल झिरमिले व राजश्री सोले यांनी तृतीय क्रमांक तर डॉ. नंदा हरम यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कवयित्री आश्लेषा महाजन यांनी काम पाहिले. यावेळी झालेल्या खुल्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद कवयित्री प्रभा सोनवणे यांनी भूषविले. यात ४८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य संघाच्या संस्थापक डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांनी केले. सोनग्रा यांनी उपस्थितांना कविता वाचनाचा सल्ला दिला.
नाट्यवाचन कार्यशाळा संपन्न
पुणे ः मातृभाषा अध्यापक संघ, पुणे आणि ‘माझं पुणं, सुंदर पुणं’ यांच्यातर्फे आयोजित नाट्यवाचन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पटकथा लेखक मिलिंद गाडगीळ यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मातृभाषा अध्यापक संघाच्या अध्यक्षा स्मिता ओव्हाळ यांनी संघाची माहिती दिली. वंदना आणेकर यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. ‘माझं पुणं, सुंदर पुणं’ संस्थेचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी संस्थेचा परिचय करून दिला. सचिव संध्या माने यांनी आभार मानले. अभिनव विद्यालयातील विद्यार्थिनींनी नाट्यवाचनाचे प्रात्यक्षिक सादर केले.
जनसेवा फाउंडेशनचे ज्येष्ठांना आवाहन
पुणे ः जनसेवा फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुभव आय रेडिओ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या रेडिओच्या चमूने नुकतेच १०० कार्यक्रम पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने उपक्रमात करता येणाऱ्या सुधारणांबाबत चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी ज्येष्ठ नागरिकांना काही सूचना करावयाच्या असल्यास त्यांनी janasevafoundationpune@gmail.com या ई-मेलवर आपल्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी केले आहे.
‘सादगी’ कार्यक्रमाचे सादरीकरण
पुणे ः वृषस्वर आणि मधुरजनी निर्मित ‘सादगी’ ही संगीत मैफील नुकतीच संपन्न झाली. गायिका वृषाली मावळंकर आणि गायिका-निवेदिका मंजिरी जोशी यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. अभिषेक मारोटकर यांनी गायनाची तर अमृता ठाकूरदेसाई, यश भंडारे, अपूर्व द्रविड आणि ऋतुराज कोरे यांनी वाद्यांची साथ दिली. प्रसन्न बाम यांनी वाद्यवृंद संयोजन आणि नीलेश यादव व अमित सोमण यांनी ध्वनिसंयोजन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87117 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..