
कव्वालीच्या सादरीकरणाने रंगला ‘सुफी दरबार’
पुणे, ता. ५ : ‘फर्श पे रहकर अर्श पे जाना सब के बस की बात नही,’ ‘ख्वाजा मेरे ख्वाजा दिलं मे समाजा,’ ‘छाप तिलक सब छीन ली रे मोसे नैना मिलाइके,’ ‘सांसो की माला पे सिमरूं मैं पी का नाम,’ अशा एकसेएक गाजलेल्या कव्वाली सादर करत कव्वाली गायक पवन नाईक आणि सहकाऱ्यांनी ‘सुफी दरबार’ ही कव्वाली मैफील गाजवली.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ गुरू व संगीततज्ज्ञ डॉ. विकास कशाळकर, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, नृत्य विभागप्रमुख डॉ. देविका बोरठाकूर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘अल्ला हू अल्ला हू’ या कव्वालीने झाली. त्यानंतर सादर झालेल्या ‘फर्श से लेकर अर्श को जाना सब के बस की बात नही’ या कव्वालीने मैफलीत रंगत आणली. कव्वाल बानीचे ख्याल, मनकबत, ह्मद, नात, मरसिया काफी यांची माहिती या वेळी नाईक यांनी दिली. त्यांना संवादिनीवर प्रवीण कासलीकर व कल्याण मुरकुटे, बुलबुल-तरंगवर कुलदीप चव्हाण, तबल्यावर शेखर दरवडे आणि सहगायनाची साथ विजय जाधव, निनाद पारखी, रिझवान शेख, मुलांशू परदेशी, श्रेयस शिंत्रे, पवन तळेकर व नवरतन वर्मा यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87147 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..