
अवतीभवती
क्रांतिदिनानिमित्त मुंबईत
मूक आत्मक्लेष आंदोलन
पुणे, ता. ५ : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांपर्यंत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ आत्मक्लेष आंदोलन होणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. बांठिया आयोगाच्या निष्कर्षांनुसार राज्यात ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के आहे. हे लक्षात घेऊन मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे, अशी मागणी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, प्रदेश युवकाध्यक्ष रणजित जगताप, पुणे शहराध्यक्ष वैभव शिळीमकर यांनी केली आहे.
शहर उपाध्यक्षपदी मयूर गुजर
पुणे, ता. ५ : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी मयूर गुजर यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार व राष्ट्रीय प्रवक्ते श्रीरंग बर्गे यांच्या हस्ते गुजर यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87175 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..