
सायन्स टॉइज फ्रॉम ट्रॅशवर झपूर्झा येथे कार्यशाळा
पुणे, ता. ३ ः लहान मुलांना टाकाऊ वस्तूंपासून खेळणी बनविता यावीत या हेतूने झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय कुडजे (एनडीए खडकवासला पीकॉक बेच्या पुढे) येथे ‘मेकिंग सायन्स टॉइज फ्रॉम ट्रॅश’ यावर कार्यशाळा घेतली जाणार आहे. रविवारी (ता. ७) दुपारी १२ ते ३ या वेळात शिवाजी माने ही कार्यशाळा घेणार आहेत.
मेकिंग सायन्स टॉइज फ्रॉम ट्रॅश कार्यशाळा विनाशुल्क असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्यावर प्रवेश मिळेल. टाकाऊ वस्तूंपासून विज्ञानाधारित खेळणी कशी बनवायची यावर अनेक वर्षांपासून माने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. वापरून झालेल्या टाकाऊ वस्तू काडेपेटीच्या काड्या, कागद, रबर बँड, वापरलेले टिन, टेट्रा पॅक्स, रबर स्लिपर, पेन्सिल, जुन्या बॅटरी, अल्यूमिनियम फॉईल, जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या, जुन्या कॉम्पॅक्ट डिस्क, सायकलच्या व्हॉल्व्ह ट्यूब, पेन रिफिल, पेन आदींपासून खेळणी बनविता येतात.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87183 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..