
एनसीएलमध्ये पार पडली सूक्ष्मजीव परिषद
पुणे, ता. ५ ः जागतिक सुक्ष्मजीव दिनानिमित्त राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) नुकतीच एक विशेष परिषद पार पडली. असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजीस्ट ऑफ इंडिया पुणे चाप्टर आणि विज्ञान भारतीच्या वतीने हे आयोजन केले होते.
परिषदेमध्ये बंगळूरच्या अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांचे बीजभाषण झाले. सुक्ष्मजीवक्षेत्रातील करियरच्या संधीविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. सूक्ष्मजीवांचा किंवा त्यांच्या एकंदरीत परिसंस्थेचा प्राणी, माती आणि वनस्पतींवर होणाऱ्या परिणामांविषयी, तसेच उपचारपद्धतीतील सूक्ष्मजीवांच्या उपयोगाविषयी डॉ. शौचे यांनी माहिती दिली. यानंतर चर्चासत्रात कॅलिफोर्नियातील डिग्बी हेल्थचे डॉ. रंजन सिन्हा, युनिलिव्हर इंडियाचे डॉ. युगंधर रेड्डी, नवी दिल्लीतील एम्सचे डॉ. विनीत आहुजा, झोम लाईफ सायन्सेस पियुष भानू, एनसीसीएसचे शास्रज्ञ डॉ. धीरज धोत्रे, ल्युसीन रिच बायोचे डॉ. कुमारन शंकरन यांनी मायक्रोबायोम संशोधनाच्या विविध पैलूंवर संवाद साधला. मायलॅबचे महाव्यवस्थापक डॉ. श्रीकांत पवार यांनी सूत्रसंचालन केले. एनसीएलचे उपसंचालक डॉ. एस. गोपीनाथ यांनी प्रास्ताविक केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87188 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..